आमच्याबद्दल

अॅस्पिरंट (Aspirant) म्हणजे अशी व्यक्ती जी एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी सक्रियपणे प्रयत्न करते. तुमच्या ध्येयाकडील या प्रवासात पावलोपावली तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी Being Aspirant ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. MPSC आणि UPSC परीक्षांमध्ये यश मिळवण्याच्या मार्गावरील तुमचा विश्वासू भागीदार म्हणून तुम्ही आमच्याकडे बघू शकता. MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी हा एक खडतर प्रवास आहे. हा प्रवास सुरु करताना विद्यार्थी गोंधळलेला असतो. त्याला सुरुवात नेमकी कुठून करायची, काय अभ्यासायचे – काय नाही, रिव्हिजन कशा करायच्या, परीक्षेला सामोरे कसे जायचे, एखादे अपयश आले तर ते पचवून यशाकडे कसे पुढे जायचे असे नाना प्रकारचे प्रश्न पडतात. या प्रवासात एक अॅस्पिरंट म्हणून आपले प्लानिंग कसे असावे, आचरण कसे असावे, कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या टाळाव्या, अभ्यासक्रम पूर्ण कसा करावा, प्रश्न कसे सोडवावेत, Analysis कसे करावे, चुकांतून कसे शिकावे, कौटुंबिक-सामाजिक प्रेशर हाताळून अभ्यासात एकाग्रता कशी ठेवावी म्हणजेच How to be an Aspirant ची शिकवण देणारी संस्था म्हणजे Being Aspirant. पात्र आणि अनुभवी शिक्षक सदस्यांची आमची टीम प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी समर्पित आहे. परीक्षेची गरज समजून घेऊन आम्ही आमचे कोर्सेस डिझाइन केले आहेत. MPSC आणि UPSC परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असणाऱ्या चालू घडामोडींसाठी एक्स्पर्ट म्हणून आम्हाला ओळखले जाते.

आमची वैशिष्ट्ये:

तज्ज्ञ शिक्षक: MPSC आणि UPSC पॅटर्नचे सखोल ज्ञान असलेल्या अनुभवी शिक्षकांकडून शिका. सर्वसमावेशक अभ्यास साहित्य: जटिल विषय सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेल्या चांगल्या-संशोधित, अद्ययावत अभ्यास सामग्रीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल. वैयक्तिक मार्गदर्शन: प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता वेगवेगळी असते. विद्यार्थ्याच्या मजबूत बाजू त्याला अवगत करून देणे तर कमकुवत बाजू मजबूत करण्यासाठी वन टू वन मार्गदर्शन उपलब्ध असेल. नियमित टेस्ट सिरीज: आमच्या मॉक टेस्ट्स वास्तविक परीक्षेच्या वातावरणाचे अनुकरण करतात, तुम्हाला तुमच्या प्रगतीचा मागोवा घेण्यात आणि तुमचा आत्मविश्वास वाढविण्यात मदत करतात. परिणामाभिमुख दृष्टीकोन: तुमची तयारी पक्की करण्यासाठी आम्ही व्यावहारिक प्लानिंग, स्मार्ट अभ्यास तंत्र आणि वेळेचे व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करतो. तुम्ही नवशिक्या असाल किंवा अनुभवी असाल, Being Aspirant तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षा प्रवासात नेहमीच साथ देईल. Being Aspirant App डाऊनलोड करा आणि तुमचा यशाकडील प्रवास सुकर करा. May the force be with you!

श्रीकांत साठे सरांबद्दल

स्पर्धा परीक्षा क्षेत्रात असंख्य विद्यार्थ्यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा असणारे चालू घडामोडींचे महाराष्ट्रातील नंबर 1 चे मासिक ‘यशाची परिक्रमा’चे संस्थापक कार्यकारी संपादक आणि चालू घडामोडी हा विषय सोपा करून देणारे शिक्षक म्हणून श्रीकांत साठे सरांना आपण ओळखतो. श्रीकांत साठे सर हे MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी करून घेण्यामध्ये एक्स्पर्ट असणारे अत्यंत प्रतिष्ठित आणि अनुभवी शिक्षक आहेत. 10+ वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवासह, त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना MPSC आणि UPSC परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी स्वतः विद्यार्थी दशेत असताना UPSC आणि MPSC परीक्षांच्या मुलाखती दिल्यामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील योग्य उपायांची जाण त्यांना आहे. विद्यार्थ्यांना वर्गातच नाही तर वैयक्तिकरित्या आणि पावलोपावली मार्गदर्शन व मदत करणारे शांत, संयमी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. केवळ चालू घडामोडींसाठीच नव्हे, तर UPSC आणि MPSC चे GS2, GS3, GS4 हे वर्णनात्मक पेपर्स, Sociology हा वैकल्पिक विषय आणि MPSC चे HR-HRD, Polity या विषयांचे एक्स्पर्ट म्हणून ते ओळखले जातात. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाचे सखोल आकलन, स्पष्ट conceptual अध्यापन आणि परीक्षेसाठी आवश्यक नेमक्या बाबी ओळखणे ही त्यांची खुबी आहे.

अभिजीत पाटील सरांबद्दल

अभिजीत सरांनी स्वतः UPSC च्या परीक्षांसाठी तयारी केली असून, त्यांना MPSC, RRB आणि LIC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या मुख्य परीक्षांचा अनुभव आहे. त्यांना पृथ्वी अकॅडमी पुणे, Unacademy, Byjus Exam Prep या ठिकाणी भूगोल व पर्यावरण हे विषय शिकवण्याचा 5+ वर्षांचा अनुभव आहे, त्यांनी क्लास आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना MPSC आणि UPSC परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे